Wednesday, 7 April 2021

माता रमाई जयंती..

राजकारणात येताना बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतात, काही थांबवाव्या लागतात तर बऱ्याच शिकाव्या लागतात! मग ते तुमच्या खालच्या पद्धधिकारी कडून असो की वरच्या! नेता व्हायचं म्हणजे तरुण पिढीला असे वाटते की माझ्या मागे १०० पोरं, ०४ गाड्या, हातात ब्रेसलेट अंगठी असली की झालो नेता! बरं जे मोठे नेते आहेत त्यांना सुद्धा असं वाटतं की मी कुठे तरी गेलो की माझं मोठं स्वागत व्हावं! जास्त माणसं जमावित तरच त्या कार्यक्रम ची मज्जा! राजकारण शिकायचं भले पैसे खर्च नका करू पण पहिलं वेळ द्या! आपल्या पक्षातले नेते व पद्धधिकारी कोणत्या कार्यक्रम ला कसे वागतात काय बोलतात हे महत्त्वाचे आहे! आजचा किस्सा मुद्दाम त्या तरुण पिढी साठी मांडतोय ज्यांना राजकारणात यायचं आहे! सी.बी.डी. बेलापूर ला एका पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन झाले, त्या नंतर एका कार्यकर्त्यांने शहर अध्यक्ष गजानन काळे यांना सांगितले की थोड्याच अंतरावर माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे म्हणून बुद्धीविहार च्या बाहेर एक कार्यक्रम झाला आहे तर आपण तिकडे जाऊन त्यांना विनम्र अभिवादन करावे! तेवढ्यात त्यांनी होकार देत चालत जाऊ बोलले अन कार्यक्रम च्या ठिकाणी पोचले! कार्यक्रम च्या ठिकाणी ०३ फोटो होते, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना हार घालत नमस्कार केला! समोर १५-२० चिल्ली पिल्ली गॅंग बसून मस्ती करत होती, व १०-१५ महिला उपस्थित होत्या बाकी सगळे उभे होते ते कार्यक्रमाला आलेले आमचे कार्यकर्तेच! दुसरा एखादा नेता असता तर मला वाटत नाही एवढा छोटा कार्यक्रम पाहून तो आला असता अन आला असता तर नमस्कार करून कल्टी मारली असती! पण ती लहान मुलं पाहून स्वतः गजानन काळे उठले व त्यांना माता रमाबाई बद्दल व आंबेडकरां बद्दल ०४ शब्द सांगायला सुरुवात केली! त्यांच्या बरोबर मस्ती करत फोटो काढले! ते नॉर्मल वातावरण त्यांनी ०५ मिनिटात बदलून टाकलं! माझ्या मनात विचार आला की आपण बोललो असतो का एवढ्या छोट्या कार्यक्रमात, पण यातून बरंच काही शिकण्याची गरज आहे, जे तरुण राजकारणात येतात! मनसे मध्ये खूप असे तरुण नेते आहेत ज्यांच्याकडून आपण वेगवेगळ्या गोष्टी घेऊ शकतो, जसे अभ्यासू व्यक्ती आलं तर गजानन काळे, संदीप देशपांडे मेहनती मेहनती व्यक्ती म्हणतलं तर राजू दादा, अविनाश दादा! असे एक ना अनेक लोकं पक्षात आहेत जे प्रसिद्धी पासून लांब आहेत पण त्यांच्याकडून शिकण्या सारखं खूप काही आहे! तुम्हाला एकच करायचं या सर्वनाकडून थोडं थोडं घ्यायचं अन स्वतःच अस्तित्व व मार्गदर्शन या समाजात उभं करायचं! पुन्हा एकदा, राजकारण हे वेळ,अभ्यास, मेहनत यांची बेरीज आहे!

Saturday, 3 April 2021

महाड येथील पूर ग्रंथांची मदत नाही तर कर्तव्य....

मदत नाही तर कर्तव्य पार पाडून आलो आपण ही आपले कर्तव्य पार पाडले... पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने आज कोकणामध्ये घेऊनजाण्यात आला. महाराष्ट्रावर जेव्हा-जेव्हा संकट येते तेव्हा-तेव्हा नवी मुंबई ने सदैव मदतीचा हात दिला आहे. कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्याने महापूर आल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून यामध्ये काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. पुरग्रस्तांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य असून आपण सुमारे २०० कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचविण्याचे काम आज केले आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, यासाठी संसार उपयोगी वस्तू, कपडे, आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी वस्तू तसेच महिलांसाठी कपडे, ब्लँकेट आदींसह विविध जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक कोकणामध्ये घेऊनजाण्यात आला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष बांधील असून मदतीचा ओघ यापुढेही सुरू राहील.

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...