Saturday, 29 June 2024

१३ कामगारांचे ३ महिन्याचे वेतन कंपनी मध्ये थकले...

बेलापूर नवी मुंबई प्रभाग क्र. ३९ मधील १३ कामगारांचे वेतन ३ महिन्यांपासून थकले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी आज २९ जून २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेलापूर विभाग जनता दरबारात अर्ज दाखल केला आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने त्यांना वेळेवर पगार न दिल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी अनेकदा कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली, परंतु त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या कामगारांनी आता मनसे जनता दरबारात अर्ज दाखल करून त्वरित मदत आणि न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...