Friday, 23 August 2024

नवी मुंबईत शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

नवी मुंबईत शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती नवी मुंबईत घडू नये यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे महापालिकेला पत्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची शाळांमध्ये तात्काळ अंमलबजावणी करण्याची मनसे विद्यार्थी सेनेकडून मागणी अन्यथा विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या शाळांना मनसे विद्यार्थी सेना चांगलाच धडा शिकवणार नवी मुंबई - शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत आज शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी महापालिका आयुक्तांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी हे निवेदन स्वीकारले. या शिष्टमंडळात मनसे विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, प्रतिक खेडकर, श्रेयस शिंदे, दशरथ सुरवसे, शहर सचिव समृद्ध भोपी, ध्रुव मोहिते, शुभम इंगवले, निखिल थोरात, शहर सहसचिव मधुर कोळी, विपुल पाटील, विभाग अध्यक्ष ऋषिकेश पवार, मा. विभाग अध्यक्ष सिद्धेश जगे, उपविभाग अध्यक्ष मयंक घोरपडे हे उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुसूचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बदलापूरच्या घटनेची नवी मुंबईत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. याबाबत शाळेत कंट्रोल रूम असावी. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासण्यात यावेत. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावी. शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे - सुरक्षारक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कुल बसचे चालक इ.बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनाने करावी. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घ्यावा त्यानंतर नेमणूक करण्यात यावी. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी. शाळांमध्ये बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्यात यावी. शाळांमध्ये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात यावे. शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून एक आठवड्यात करावे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुसूचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबधित शाळा व्यवस्थापन/संस्था/मुख्याध्यापक/शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. या सर्व अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश नवी मुंबईतील सर्व शाळांना देण्यात यावेत अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाकडून यावेळी करण्यात आली. अन्यथा विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या शाळांना ' मनसे स्टाईल ' ने चांगलाच धडा शिकवण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेकडून यावेळी देण्यात आला.

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...