Thursday, 26 February 2026
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी"
सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला...
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्रांचा गौरव सोहळा संपन्न झाला. भाषा केवळ बोलण्याने टिकत नाही, ती कर्तृत्वाने मोठी होते. नवी मुंबईच्या जडणघडणीत आणि सामाजिक जीवनात मोलाचे योगदान देणाऱ्या या 'मानकर्यांनी' आपल्या कार्यातून मराठीचा बाणा जपला आहे.
⭐ सन्मानाचे मानकरी ⭐
🔹 श्री. मोहनलाल तेली (शिक्षक): ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात स्वतःला झोकून देऊन, उद्याची पिढी घडवणारे आदर्श व्यक्तिमत्व.
🔹 श्री. सुर्यकांत गणपतराव कुंभार (सेवानिवृत्त स. पो. उपनिरीक्षक, मुंबई पोलीस): वर्षानुवर्षे जनसेवेचा वसा घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखणारे आमचे रक्षक.
🔹 श्री. सुहास प्रभाकर सोनटक्के (टॅक्स कन्सलटन्ट, बेलापूर): व्यावसायिक क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेने आणि सचोटीने नवी मुंबईची मान उंचावणारे तज्ज्ञ.
शाल आणि सन्मानचिन्ह हे केवळ प्रतीक आहे, खरा सन्मान तर तुमच्याबद्दल लोकांच्या मनात असलेल्या आदराचा आहे. तुमच्या या यशाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे!
Friday, 23 August 2024
नवी मुंबईत शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
नवी मुंबईत शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती नवी मुंबईत घडू नये यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे महापालिकेला पत्र
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची शाळांमध्ये तात्काळ अंमलबजावणी करण्याची मनसे विद्यार्थी सेनेकडून मागणी
अन्यथा विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या शाळांना मनसे विद्यार्थी सेना चांगलाच धडा शिकवणार
नवी मुंबई - शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत आज शुक्रवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी महापालिका आयुक्तांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी हे निवेदन स्वीकारले. या शिष्टमंडळात मनसे विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, प्रतिक खेडकर, श्रेयस शिंदे, दशरथ सुरवसे, शहर सचिव समृद्ध भोपी, ध्रुव मोहिते, शुभम इंगवले, निखिल थोरात, शहर सहसचिव मधुर कोळी, विपुल पाटील, विभाग अध्यक्ष ऋषिकेश पवार, मा. विभाग अध्यक्ष सिद्धेश जगे, उपविभाग अध्यक्ष मयंक घोरपडे हे उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुसूचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बदलापूरच्या घटनेची नवी मुंबईत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. याबाबत शाळेत कंट्रोल रूम असावी. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासण्यात यावेत. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावी. शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे - सुरक्षारक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कुल बसचे चालक इ.बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनाने करावी. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घ्यावा त्यानंतर नेमणूक करण्यात यावी. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी. शाळांमध्ये बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्यात यावी. शाळांमध्ये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात यावे. शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून एक आठवड्यात करावे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुसूचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबधित शाळा व्यवस्थापन/संस्था/मुख्याध्यापक/शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. या सर्व अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश नवी मुंबईतील सर्व शाळांना देण्यात यावेत अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाकडून यावेळी करण्यात आली. अन्यथा विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या शाळांना ' मनसे स्टाईल ' ने चांगलाच धडा शिकवण्याचा इशारा मनसे विद्यार्थी सेनेकडून यावेळी देण्यात आला.
Saturday, 6 July 2024
एक दिवस तरी वारी अनुभवावी
एक दिवस तरी वारी अनुभवावी
हे वाक्य ऐकूनच मनात आनंद आणि उत्साह निर्माण होतो. वारी हा केवळ प्रवास नाही तर आध्यात्मिक अनुभव, सांस्कृतिक दर्शन आणि समाजिक बंधुता यांचा मिलाफ आहे. विठ्ठल आणि संत यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी पंढरपूर ला पायी जातात.
Saturday, 29 June 2024
१३ कामगारांचे ३ महिन्याचे वेतन कंपनी मध्ये थकले...
बेलापूर नवी मुंबई प्रभाग क्र. ३९ मधील १३ कामगारांचे वेतन ३ महिन्यांपासून थकले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी आज २९ जून २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेलापूर विभाग जनता दरबारात अर्ज दाखल केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने त्यांना वेळेवर पगार न दिल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी अनेकदा कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली, परंतु त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या कामगारांनी आता मनसे जनता दरबारात अर्ज दाखल करून त्वरित मदत आणि न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Wednesday, 17 April 2024
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसाळ्यात स्थानिक लोकांची गैरसोय निर्माण होत असते गेले कित्तेक वर्ष असे मोडकळीस आलेले बसस्टॉप आपण बघत आलोय परंतु गेले वर्षभर आपण त्यासंबंधी नवी मुंबई परिवहन विभागाशी सतत चा पाठपुरवठा करतोय त्यामुळे आज आपल्या प्रयत्नाने गेले १० महिन्यांनी बसथांबे बेलापूर सेक्टर १५ साई संगम येथे बसवन्यात आले आहेत बाकी विद्या प्रसारक हायस्कूल मागील १ बसथांब्याचे काम प्रगतीपथावर आहेत त्यातला बेलापूर सेक्टर १५ येथिल साई संगम बस स्टॉप चे काम आज पूर्ण झाले आहे, त्वरित बेलापूर सेक्टर १५ मधिल २ दिवसात काम होऊन प्रवाशांसाठी खुले करण्यात येनार आहेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम यांनी सदर काम करुण दिल्या बद्दल नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाचे आभार
ऋषिकेश शैला गोविंद पवार
(म.न.वि.से विभाग अध्यक्ष बेलापूर)
९१६७४२८०५०
Monday, 26 February 2024
मराठी भाषा गौरव दिना निमित्त राज्य गीती प्रतिमा भेट...
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नवी मुंबई मनसे कडून शहरातील विविध शाळा, महाविद्यालय,
पोलीस स्टेशन व सरकारी आस्थापणांमध्ये राज्यगीताच्या प्रतिमा भेट देण्यात दिल्या.
यावेळी सन्मा.अमितसाहेब ठाकरे यांनी मागणी केल्यानुसार हे राज्यगीत दर्शनी भागात
लावण्याची मागणी करण्यात आली. #मराठीभाषा #दिवस
Saturday, 25 November 2023
भारतीय संविधान दिन...
'भारतीय संविधान दिना'च्या शुभेच्छा ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानाला आजच्या दिवशी मान्यता प्राप्त झाली. त्यामुळे हा दिवस 'संविधान दिन' म्हणून देशभर साजरा केला जातो. देशात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता टिकून रहावी, यासाठी हा दिवस साजरा होतो या दिनानिमित्त बेलापूर येथील नालंदा बौद्ध विहार पंचशील नगर क्र. १ येथे संविधान दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संविधान वाचन करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी म.न.से उपविभाग अध्यक्ष संदेश पाटील, म.न.से जनहित कक्ष सहासचिव प्रशांत कोळी, म.न.से शाखा अध्यक्ष प्रकाश कोकाटे, म.न.वि.से विभाग अध्यक्ष सिद्धेश जागे, म.न.वि.से उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश पवार उपस्थित होते...
Saturday, 4 November 2023
मनसे मुळे ७ कुटुंबांची दिवाळी आनंदाने साजरा होणार...
मनसे मुळे ७ कुटुंबांची दिवाळी आनंदने साजरी होणार... गेल्या १ महिन्या पासून कंपनी ने ७ कामगाराचा पगार अडकवून ठेवला होता, व ते सर्वे युवक आपल्या मनसे जनसंपर्क कार्यालय न्यायाची आशा घेऊन आले होते, राज साहेबांच्या आशीर्वादा ने मनसे ची टीम कंपनी च्या ऑफिस मध्ये जाऊन कंपनी च्या मालकाशी भेटून मीटिंग केली आणि जागाच्या जागी कामगाराच्या हाती त्याच्या हक्काचा पागर चेक व ऑनलाईन पेमेंट च्या माध्यमातून करून घेतली..
या प्रसंगी मनसे विभाग अध्यक्ष श्री. भूषण कोळी, मनसे जनहित कक्ष सहसचिव श्री. प्रशांत कोळी, मनसे बेलापूर विभाग शाखा अध्यक्ष श्री. प्रकाश कोकाटे, मनविसे शहर सहसचिव कु. मधुर कोळी व मनविसे उपविभाग अध्यक्ष कु. ऋषिकेश पवार हे पदाधिकारी उपतिस्थी होते.
Thursday, 26 October 2023
पाणीपुरवठा विभागाचे धन्यवाद..
नवी मुंबई पाणी पुरवठा विभाग चे
मना पासून खूप खूप आभार..
बेलापूर विभागातील पंचशिल नगर नं. १ सेक्टर-१९/२० येथे गेल्या ४ ते ५ महिन्यापासून पाणी पुरवठ्याचा दाब कमी होत असल्यामुळे होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठयाबाबत आपण लकरत लवकर पाईप लाईनचे काम करून दिले, आपल्या मुळे हा पाण्याचा विषय मार्गी लागला..
Tuesday, 26 September 2023
बाप्पा चे दर्शन
चिंचपोकळी चिंतामणीच्या बाप्पांचे चरण दर्शन 😍🙇
रात्रभर फिरून गणपती बाप्पा बघायची आणि दर्शनाची मज्जाच वेगळी आहे. ♥️
#बाप्पामोरया #ganpati2023
Wednesday, 20 September 2023
बेलापूर विभागातील पाण्याचा प्रश्नांना निमित्त बैठक...
श्री. अरविंद शिंदे साहेब उप अभियंता (पाणी पुरवठा विभाग) यांच्याशी भेटून गेल्या ४ ते ५ महिन्यापासून होत असल्यामुळे बेलापूर विभागातील शहाबाज सेक्टर- १९ व पंचशिल नगर नं. १, सेक्टर-१९/२० येथे होणान्या अपुऱ्या पाणी पुरवठयाबाबत स्थानिक रहिवाशांची अभियंतान सोबत चर्चा झाली आणि यावर लकरत लवकर योग्य कार्यवाही करू आसा रहिवाश्यांना अभियांतनी दिलासा दिला.
Subscribe to:
Comments (Atom)
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
-
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसा...
-
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...

















































