Thursday, 11 February 2021

रस्ते दुरुस्ती..

आपल्या प्रभागातील सेक्टर 20, मधील गाव देवी मंदिर परिसरामध्ये खड्डे पडले होते तसेच त्याच्या आजूबाजूला काही काम चालू होते परंतु १ ते २ वर्ष झाले ते काम पूर्ण होऊन ती जागा अर्धवट भरून त्यावर डांबरीकरण करण्यात आले नव्हते त्यामुळे तेथून प्रवास करणाऱ्या वाहनांना तसेच ये-जा करणाऱ्या नागरीकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता, तसेच सध्या येऊ घातलेल्या #स्वच्छता_अभियान_२०२१ च्या अनुषंगाने तेथे अस्वच्छता दिसत असल्याने त्या गोष्टीची तात्काळ दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व महाराष्ट्र सैनिक व प्रशांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः दखल घेऊन त्या संदर्भात स्वच्छता अभियान २०२१ च्या पार्श्वभूमीवर मा विभाग अधिकारी अ विभाग कार्यालय बेलापूर नवी मुंबई महानगरपालिका यांना आज दिनांक १०/०२/२०२१ रोजी निवेदन देऊन तेथे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी संदेश पाटील उपविभाग अध्यक्ष म.न.से प्रकाश कोकाटे शाखा अध्यक्ष म.न. से सिद्धेश जगे विभाग अध्यक्ष म.न.वि.से ऋषिकेश पवार उपविभाग अध्यक्ष म.न.वि.से अजय ठाकूर राजदूत (गट अध्यक्ष) मनीष खंडागळे म.न.श. से उपविभाग अध्यक्ष प्रशांत कोळी महाराष्ट्र सैनिक राजेश राणे महाराष्ट्र सैनिक इतेन कोळी महाराष्ट्र सैनिक सागर कोळी महाराष्ट्र सैनिक प्रिया कोळी महाराष्ट्र सैनिक यांनी निवेदन केले होते व लगेच २ दिवसात आत त्या ठिकाणी डांबरीकरण करून देण्यात आले. ही कामाची तत्परता दाखवून लवकरात लवकर काम केल्याबद्दल महानगरपालिका तसेच इंजिनीयर रितेश साहेब याना धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनापासून आभार, असेच आम्हाला वेळो वेळी सहकार्य कराल हीच अपेक्षा.

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...